दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ५२
एका खोलीत बसून बसून गौरवी कंटाळायची... म्हणून ती खोलीच्या बाहेर हॉलमध्ये यायची...
तीला वाटायचं हळूहळू मी यांना आपलसं करेन... यांच्यात सामील होईन...
पण तसं नव्हतंच... आता गौरवीसोबत घरात होणारा सूक्ष्म मानसिक छळ सुरू झाला होता...
“ही वाट सोडून चाल…”
“ते भांडे तिथे ठेवू नको…”
“देवघराच्या जवळ उभी राहू नको…”
"इथे बसू नको..."
"तुझे भांडे वेगळे ठेव..."
हे शब्द ओरडून नव्हते… पण दररोजची होती…
“ते भांडे तिथे ठेवू नको…”
“देवघराच्या जवळ उभी राहू नको…”
"इथे बसू नको..."
"तुझे भांडे वेगळे ठेव..."
हे शब्द ओरडून नव्हते… पण दररोजची होती…
कोणी थेट अपमान करत नव्हतं… पण तिला सतत आठवण करून दिली जात होती... "तु इथली नाहीस…, तु आमच्या जातीची नाहीस..."
स्वयंपाकघरातून येणारा गरम चहाचा वास तिच्यापर्यंत यायचा…
पण तो चहा कधीच तिच्यासाठी नव्हता…
पण तो चहा कधीच तिच्यासाठी नव्हता…
घरात शिजलेले अन्न तीच्या वेगळ्या ठेवलेल्या भांड्यात ठेवून देत असे...
तीचे धुतलेले कपडे सुकत घालायला वेगळी जागा दिली गेली होती...
घरातली सासुबाई आणि ननंदेचे हसणं गौरवीपर्यंत पोहोचायचं… पण त्या हास्यात सामील करण्यासाठी तिच्यासाठी जागा नव्हती…
माधवची बहीण तिला पाहून हळूच आईला म्हणायची...
“अजून किती दिवस ठेवणार आहेस हिला इथे…?”
“अजून किती दिवस ठेवणार आहेस हिला इथे…?”
आणि ते वाक्य गौरवीच्या कानावर थेट नाही… पण
हृदयावर बरोबर आदळायचं…
हृदयावर बरोबर आदळायचं…
…आणि हळूहळू गौरवी बोलायचं थांबवू लागली…
कारण प्रत्येक शब्द इथे गैरसमज ठरत होता… आणि तीची प्रत्येक उपस्थिती चूक वाटवली जात होती…
कारण प्रत्येक शब्द इथे गैरसमज ठरत होता… आणि तीची प्रत्येक उपस्थिती चूक वाटवली जात होती…
ती हॉलमध्ये येऊन बसायची… टीव्ही सुरू असायचा…
सगळे पाहत असायचे… पण तिच्यासाठी तो आवाजही
परका होता…
सगळे पाहत असायचे… पण तिच्यासाठी तो आवाजही
परका होता…
कोणी तिला उठायला सांगायचं नाही…
पण तिला बसल्याचं सहनही केलं जायचं नाही…
पण तिला बसल्याचं सहनही केलं जायचं नाही…
ती पाणी प्यायला उठली
तर वाट मोकळी करून दिली जायची…
तर वाट मोकळी करून दिली जायची…
जणू तिचा स्पर्श लागणं काहीतरी अपवित्र असावं…
एक दिवस तिच्या हातून चुकून
पाण्याचा ग्लास स्वयंपाकघराच्या ओट्यावर ठेवला गेला…
पाण्याचा ग्लास स्वयंपाकघराच्या ओट्यावर ठेवला गेला…
कोणाचं ओरडणं झालं नाही… फक्त ननंदेने तो ग्लास उचलून दूर ठेवला… आणि म्हणाली...
“हे इथे ठेवायचे नाही… तुला हे सांगितलेलं आहे ना…”
त्या वाक्यात राग नव्हता… पण हक्कही नव्हता…
“हे इथे ठेवायचे नाही… तुला हे सांगितलेलं आहे ना…”
त्या वाक्यात राग नव्हता… पण हक्कही नव्हता…
त्या क्षणी गौरवीला समजलं...
ही लढाई मोठ्या आवाजाची नाही…
ही लढाई हळूहळू माणूस पुसून टाकणारी आहे…
ही लढाई मोठ्या आवाजाची नाही…
ही लढाई हळूहळू माणूस पुसून टाकणारी आहे…
रात्री माधव कामावरून घरी यायचा… आणि विचारायचा...
"सगळं ठीक आहे ना...?"
"सगळं ठीक आहे ना...?"
ती त्याच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न करायची… आणि म्हणायची...
“सगळं ठीक आहे…”
“सगळं ठीक आहे…”
"मग आजचा दिवस कसा गेला...?" असं माधव रोज विचारायचा...
आणि ती रोज एकच उत्तर द्यायची...
"छान गेला..."
"छान गेला..."
कारण तिला माहित होतं... जर तिने खरं सांगितलं
तर तो चिडेल… भांडणं होईल… आणि त्याचा फटका
पुन्हा तिच्याच अंगावर येईल…
तर तो चिडेल… भांडणं होईल… आणि त्याचा फटका
पुन्हा तिच्याच अंगावर येईल…
म्हणून ती दिवसा सहन करायची…
आणि रात्री शांतपणे माधवच्या कुशीत डोळे मिटून
स्वतःलाच समजवायची...
“थोडा वेळ लागेल… कारण सगळं बदलतं… तोपर्यंत मी वाट बघत थांबते…”
आणि रात्री शांतपणे माधवच्या कुशीत डोळे मिटून
स्वतःलाच समजवायची...
“थोडा वेळ लागेल… कारण सगळं बदलतं… तोपर्यंत मी वाट बघत थांबते…”
पण आत कुठेतरी
तिचं मन विचारू लागलं होतं—
“मी वाट बघत थांबतेय खरं... पण ते मला खरंच स्वीकारणार तरी आहेत का…?”
तिचं मन विचारू लागलं होतं—
“मी वाट बघत थांबतेय खरं... पण ते मला खरंच स्वीकारणार तरी आहेत का…?”
आणि त्या प्रश्नाचं उत्तर
दररोज एका नव्या मौनातून
तिला मिळत होतं…
दररोज एका नव्या मौनातून
तिला मिळत होतं…
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
